– उपाध्यक्षपदी रचना गहाणे, दादा सातव, अशोक खेडकर आदींची नियुक्ती
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व किसान मोर्चाचे प्रभारी आ. संजय कुटे आणि अध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. उपाध्यक्षपदी रचना गहाणे (गोंदिया), दादा सातव (पुणे), अशोक खेडकर (अहिल्यानगर) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी रंगनाथ सोळंके (परभणी), पृथ्वीराज पवार (सांगली), शामाराम साहेबराव हिरे (नाशिक) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी तानाजी (बापू) थोरात (पुणे), सुनिल गोगटे (रायगड), रामदास कोळगे (धाराशिव) यांची तर कोषाध्यक्षपदी समीर मिश्रा (नवी मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.





