spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘वंदे मातरम्’च्या गायनात अडथळा आणल्याप्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी व खरगे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

– नव्या कायद्यानुसार कारवाई करण्याची संभाजीनगर येथील भाजपा नगरसेवक नंदकुमार गवळी यांची मागणी

नवी दिल्ली :- ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनास जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केल्याचा आरोप करत, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नंदलाल सुरेश गवळी यांनी काँग्रेसनेत्या सोनिया गांधी, खा. राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरुद्ध छत्रपती संभाजीनगर येथील जवाहर नगर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीत नमूद केल्यानुसार, दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 9 वाजता दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात (24 अकबर रोड) झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन सुरू असताना वरील तिन्ही नेत्यांनी परस्पर संकेत व हावभाव करून, तसेच उपस्थित व्यक्तींना निर्देश देऊन गायनात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचे एका दृश्य-श्राव्य चित्रफितीत प्रथमदर्शनी दिसून येते, असा दावा गवळी यांनी केला आहे.

गुन्हा दिल्ली येथे घडला असला तरी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 173 (1) अन्वये तो “झिरो एफ.आय.आर.” म्हणून नोंदवून संबंधित हद्दीतील पोलीस ठाण्याकडे वर्ग करावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमाचे मूळ व्हिडिओ फुटेज, सीसीटीव्ही फुटेज, संबंधित यूट्यूब व्हिडिओचे मेटाडेटा व मूळ डिजिटल प्रत तातडीने सुरक्षित करून प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवावेत, अशीही विनंती करण्यात आली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.