spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अस्थिका समाजाचा १९ वा दीपोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

नागपूर :- त्रिमूर्ती नगरातील अस्थिका समाजाच्या वतीने आयोजित १९ वा, दीपोत्सव सोहळा, श्री भगवती सभागृहात तीन दिवस भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या आनंदाने नुकताच संपन्न झाला. विदर्भातील विविध भागांतून तसेच विविध समाजघटकांतून आलेल्या हजारों भाविकांनी या सोहळ्यात सहभाग नोंदविला होता. सर्वप्रथम गणपती पूजन व घटस्थापनेने सोहळ्याचा शुभारंभ झाला. चेन्नई येथील युवा प्रवचनकार आध्या वेंकटेश यांनी संकीर्तन प्रवचनातून भाविकांना मंत्रमुग्ध केले. आदिपुरम दिनानिमित्त गणपती पूजन, कन्या पूजन व कुमारी पूजनानंतर वैदिक संशोधन केंद्रातील विद्यार्थ्यांनी गुरुजी प्रवीण लिगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वेदपारायण सादर केले. सुहासिनींची भव्य दीपपूजा पार पडल्यानंतर या धार्मिक विधीत समाजातील महिला सहभागी झाल्या होत्या.

श्रीनगर येथील ‘अहिगिरी नंदिनी’ महिला समूहाने ‘महिषासुर मर्दिनी’ या गीतावर आधारित आकर्षक सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. तीनही दिवस परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवी भवानी व देवी अंडाळ यांचे दर्शन घेतले. दीपपूजेसाठी नोंदणी केलेल्या सर्व सुहासिनींसाठी अस्थिका समाजाच्या व्यवस्थापन समितीने आवश्यक व्यवस्था केली होती. सर्व धार्मिक विधी नियोजित वेळेत सुरळीतपणे पार पडला. सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अस्थिका समाजाच्या व्यवस्थापन समितीने अथक परिश्रम घेतलेत. देवी अंडाळ व देवी भवानी यांच्या मंगला आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. या सांस्कृतिक कार्यक्रमात राजू तलमले यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमात शेवटच्या दिवशी अतिथी पाहुण्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. त्यापैकी एक विशेष अतिथी पाहुणे देवराव प्रधान व त्यांच्या प्रतिभा प्रधान यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. हे विशेष: समाजाचे मनमिळावू सचिव, के.व्ही. नागराजन यांनी सर्व भाविकांचे आभार मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.