spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महावितरण कार्यालयात सद्भावना दिवस प्रतिज्ञा

नागपूर :- भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त महावितरण कार्यालयात नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी महावितरण कार्यालयातील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा दिली.

महावितरणच्या काटोल मार्गावरील विद्युत भवन येथे जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची, तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गाने सोडविण्याची प्रतिज्ञा अधीक्षक अभियंता दिपाली माडेलवार यांनी उपस्थितांना दिली. याप्रसंगी अधीक्षक अभियंता अमित परांजपे, उप महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव, कार्यकारी अभियंता अमित शिवलकर, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) सुधीर टेकाम, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांच्यासह महावितरणचे अधिकारी, अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles