spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

थकीत मालमत्ता कर वसुलीच्या मोहिमेला सुरूवात

– सर्व झोनमध्ये कर वसुलीसाठी 400 कर्मचारी तैनात

नागपूर :- थकीत मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने धडक मोहिम आजपासून (ता. 20) सुरू केली आहे. शहरातील 10 झोनमधील थकीत मालमत्ता कराच्या वसुलीच्या मोहिमेला सुरूवात झाली आहे. ही मोहिम येत्या 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यात पहिल्याच दिवशी १ कोटी ७७ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

महापौर निता ठाकरे यांच्या निर्देशानुसार व आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनात व मोहिमेला सुरूवात झाली आहे. या मोहिमेचे नेतृत्व मनपाचे अतिरिक्त आयुक्त  मुरुगानंथम एम. आणि मिलिंद मेश्राम करीत असून, मोहिमेअंतर्गत 1 हजार कोटी रुपये थकीत मालमत्ता कर वसूल करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे व सत्ता पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनीही नागरिकांना थकीत मालमत्ता कर भरण्याचे आवाहन केले आहे.

मनपाचे अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम एम. यांच्या उपस्थितीत लक्ष्मीनगर झोन अंतर्गत नारायण विद्यालयात थकीत कारच्या संदर्भात वारंट कारवाई करण्यात आली. मंगळवारी झोन अंतर्गत महात्मा गांधी शाळा येथे देखील वारंट कारवाई करण्यात आली. याशिवाय महराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाला देखील वारंट बजावण्यात आला.

यासंदर्भात आयुक्त डॉ. विपीन यांनी नुकतीच मनपाच्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरिय बैठक घेऊन ही धडक मोहिम यशस्वी करण्यासाठी झोननिहाय प्रयत्न करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी विशेष पथक गठीत करून थकीत मालमत्ता कराची रक्कम वसूल करण्यासाठी 400 कर्मचार्यांना विशेष जबाबदारी दिली आहे. व्यावसायिक, संमिश्र वापर, अनिवासी व मोकळ्या भूखंडावरील थकबाकी वसुलीला प्राधान्य देण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विपीन यांनी दिले आहेत.

करदात्यांना सुलभपणे थकीत कर भरण्यासाठी कर संग्राहकांना पॉस मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. या मोहिमेच्या पहिल्या दिवशी मनपाने मालमत्ताधारकांकडून १ कोटी ७७ लाख रुपये मालमत्ता कराची वसुली केली आहे. यात सर्वाधिक हनुमाननगर झोनने वसुली केली असून या झोनने 22 लाख 46 हजार रुपयांची वसुली केली आहे. याशिवाय गांधीबाग झोनने 3 लाख 92 हजार व नेहरूनगर झोनने 2 लाख 21 हजार रुपयांची मालमत्ता कराची वसुली केली आहे.

Popular Articles