– महापौरांच्या निर्देशांची अंमलबजावणी करत एकाच झोनच्या सहा आस्थापनांना नोटीस
नागपूर :- महापौर निता ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात कठोर कार्यवाही करण्यात येत आहे. शहरातील अतिक्रमण व अवैध बांधकामाच्या विरोधात नागपूर महानगरपालिकेने धडक कार्यवाही करीत गुरुवारी (ता. २०) सर्व दहाही झोनमध्ये नोटीस कारवाईला वेग आला आहे. विशेष म्हणजे, लक्ष्मीनगर झोन अंतर्गत परिसरातील अतिक्रमणांविरोधात धडक कार्यवाही करण्यात आली असून, आवश्यक ठिकाणी पोलीस दलाच्या मदतीने ठेले जप्त करण्यात आली आहे. तसेच धंतोली झोन मध्ये सहा आस्थापना यांना नोटीस बजाविण्यात आल्या.
महापौरांच्या निर्देशानुसार मनपाच्या संबंधित विभाग व झोन कार्यालयांमार्फत शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमणांची व अनधिकृत बांधकामांची पाहणी करण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन आढळलेल्या संबंधितांना नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये कार शोरूम, फर्निचर गोडाऊन, टिम्बर मिलच या आस्थापना तसेच इतर स्वरूपाच्या अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे.
लक्ष्मीनगर झोन: लक्ष्मीनगर झोन अंतर्गत शंकर नगर, बजाज नगर, लक्ष्मीनगर, श्रद्धानंदपेठ, या परिसरांतील अवैध बांधकाम व अतिक्रमणाची पाहणी करण्यात आली. त्यानुसार येथील अतिक्रमण करणाऱ्या दुकानांच्या विरोधात पोलीस दलाच्या मदतीने आवश्यक ठिकाणी दुकाने जप्तीची कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच व्ही.एन.आय.टी. आणि आयटी पार्क परिसरातही संबंधित कार्यवाही करून नोटीस देण्यात आले आहे.
धंतोली झोन : धंतोली झोन अंतर्गत कडक कार्यवाही करत सहा आस्थापनांना नोटीस देण्यात आले आहे. यात कार शोरूम, फर्निचर गोडाऊन, टिम्बर मिलचा समावेश आहे. विदित पटेल फर्निचर गोडाऊन, आरवदया किया कार शोरूम, ओम शिव स्वा. मिल टिम्बर, डिकी मोटर्स आणि मे. मायक्रोपार्क लॉजिस्टिक प्रा.लि. उन्नती मोटर्स या आस्थापनांवर कार्यवाही करत नोटीस देण्यात आले आहे.
धरमपेठ झोन : नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच शहरातील बांधकामांमध्ये कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेची ही कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. कार्यवाही करण्यात नोटीस बजावण्यात आलेल्या संस्थांची नावे खालील प्रमाणे आहे. संजीव योगराज आरोय (Central scientific company), सारंग अगांलावर (ICAD school).








