spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हानच्या बीकेसीपी शाळेच्या कुस्तीपटुंची राज्यस्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी

– नागपुर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवित विद्यार्थ्यांनी पटकावली सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके

कन्हान :- अहिल्यानगर (महाराष्ट्र) येथे आयोजित सब-ज्युनियर स्टेट कुस्ती चॅम्पियनशिप व नॅशनल सिलेक्शन ट्रायल्स २०२६-२७ स्पर्धेत नागपुर जिल्ह्यातील खेळाडुंनी दमदार कामगिरी करत जिल्ह्याचे नाव लौकिक केले.

बीकेसीपी स्कूल कन्हानच्या विद्यार्थ्यांनी विविध गटांत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली. यात सुवर्णपदक-वैष्णवी रविंद्र कोतपल्लीवार व सक्षम दुर्गेश तालेकर यांनी राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. रौप्यपदक- दर्शिल प्रविण लोखंडे, वेदांत विष्णु कुथे व नक्ष गोपाल पाचे यांनी रौप्यपदक मिळविले. कांस्य पदक- संपदा सचिन यादव, कुशल राजेंद्र मस्के, प्रथमेश प्रमोद कोमठी व शिवम दुर्गेश तालेकर यांनी कांस्य पदक पटकावले. या स्पर्धेत सुवर्ण व रौप्यपदक मिळविणाऱ्या खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असुन राष्ट्रीय स्पर्धा पंजाबमधील लुधियाना येथे ७ सप्टेंबर दरम्यान आयोजित होणार आहे. विजयी खेळाडुंचे महाराष्ट्र कुराश (कुस्ती) अध्यक्ष अंकुश नागर, सचिव शिवाजी साळुंके, नागपुर जिल्हा प्रमुख अमित ठाकुर, जिल्हा प्रतिनिधी क्षितिज सिरिया, अनुज शास्त्री, चिन्मय भगत, हर्षल बढेल, राज झुनझुनकर यांच्यासह मान्यवर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

बीकेसीपी स्कूल कन्हानचे संचालक राजीव खंडेलवाल, सचिव पुष्पा गेरोला, मुख्याध्यापिका कविता नाथ तसेच प्राथमिक मुख्याध्यापिका रूमाना तुरक यांनीही सर्व विजेत्या खेळाडुंचे कौतुक करून पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Popular Articles