spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सावनेर नगर परिषदेमध्ये समस्यांवर आढावा बैठक; भाजप पदाधिकाऱ्यांची सक्रिय उपस्थिती

 

सावनेर, ता. ७: नगर परिषद सावनेर येथे अध्यक्ष तथा प्रशासक  संपत खलाटे, मुख्याधिकारी सुमेध अलोने तसेच सर्व विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत सावनेर शहरातील विविध नागरी समस्यांबाबत एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत भाजप नेते रामराव मोवाडे, भाजपा मंडळ अध्यक्ष मंदार मंगळे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात सध्या भेडसावत असलेल्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये मुख्यत्वे गुंठेवारी संदर्भातील प्रश्न, घनकचरा व्यवस्थापन, पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दुरवस्था, त्यामुळे मुरूम व चुरी टाकण्याची गरज, वाढलेल्या गवतावर तणनाशक फवारणी करणे, शहरात मोकाट जनावरांची नियंत्रण व्यवस्था, नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करणे, नादुरुस्त हँडपंपांची दुरुस्ती, धोकादायक झाडांची छाटणी करणे, व्यायामशाळांची देखभाल व दुरुस्ती, तसेच डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना यासारख्या मुद्द्यांचा समावेश होता. या सर्व समस्यांवर तातडीने उपाययोजना राबवाव्यात आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे ठोस मागण्या मांडल्या. या बैठकीत माजी नगरसेवक राजू घुगल, रवींद्र ठाकूर, दिवाकर नारेकर, तुषार उमाठे, कुलभूषण नवधिंगे, रितेश सूर्यवंशी, आशिष मानकर, अरविंद ताजने, विजय लाड, मोहन कानेफाडे, राधेश्याम उल्माले, पिंटू सातपुते, मनीष खंगारे, प्रज्वल कांबळे, अंकित भोपे, रत्नाकर ठाकरे यांच्यासह इतर अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीदरम्यान शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी अशा प्रकारच्या आढावा बैठका नियमित घेण्यात याव्यात, असा सूर सर्वच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Popular Articles