किशोर साहू, मौदा :- आदिवासी गोवारी (गोंड गोवारी) फाउंडेशन चे वरिष्ठ सदस्य रामटेक तालुक्यातील मुसेवाडी येथील लक्ष्मण राऊत यांच्या मुलगा तेजस लक्ष्मन राऊत याची भारतीय सेनेमध्ये ट्रेनिंग पुर्ण केल्याबद्दल नुकताच त्याचा भव्य स्वागत सत्कार समारंभ मूसेवाडी ग्रामपंचायत चे सरपंच, सदस्य व सर्व गावकरी समाज बांधवांचा उपस्थित पार पडले. आदिवासी गोवारी (गोंड गोवारी) फाउंडेशन तर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन तेजसचे स्वागत व सत्कार करून तेजसचा मनोबल वाढवण्यात आला.
याप्रसंगी आदिवासी गोवारी( गोंड गोवारी) फाउंडेशन रामटेक अध्यक्ष भास्कर राऊत, सचिव कृष्णा सहारे, कोषाध्यक्ष सतीश गाडे ,सदस्यगण ब्रह्मानंद नेवारे, श्रावण पंचभाये,किशोर राऊत, भावेश राऊत ,गावचे सरपंचा बोरजवाडे , फाउंडेशन चे इतर सर्व सदस्यगण , सर्व गावकरी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तेजस राऊतला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.





