spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चंद्रपूर येथे जिल्हा स्तरीय सब ज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर ( मुली ) व मिक्स ( मुले व मुली ) टग ऑफ वार स्पर्धा व निवड चाचणी 2026

चंद्रपूर :- महाराष्ट्र टग ऑफ वार असोसिएशनच्या पत्रानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व मुले व मुली खेळाडूंना कळविण्यात येते कि, 27 वी सब ज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर ( मुली ) व मिक्स ( मुले व मुली ) टग ऑफ वार महाराष्ट्र राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा मुले 11 ते 13 सप्टेंबर 2026 दरम्यान सेलू जिल्हा परभणी येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर स्पर्धेत चंद्रपूर जिल्हाचा संघ सहभाग करण्याकरिता टग ऑफ वार असोसिएशन, चंद्रपूर जिल्ह्याची स्पर्धा व निवड चाचणी दिनांक 30 ऑगस्ट 2026 रोजी ठीक सकाळी 11:00 वाजता सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूरच्या मैदानावर घेण्यात येत आहे.

टग ऑफ वार असोसिएशन, चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. अनिस अहमद खान व सचिव प्रा. विक्की तुळशीराम पेटकर यांच्या उपस्थितीत निवड समितीद्वारा निवड चाचणी घेण्यात येणार आहे. सदर निवड चाचणीत सहभाग घेणाऱ्या खेळाडूंना सोबत येताना आधार कार्डची 03 प्रत झेरॉक्स व 03 पासपोर्ट फोटो सोबत आणणे अनिवार्य आहे. उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या मुले व मुली खेळाडूंचे टग ऑफ वार असोसिएशन, चंद्रपूरच्या संघात निवड केली जाईल व निवड झालेला मुले व मुलींचा संघ सेलू जिल्हा परभणी येथे चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार.

तरी इच्छूक खेळाडूंनी सहसचिव बंडू डोहे (7066666105) सौरभ बोरकर (7263058059), ईखलाख पठान (9834307243), रिंकेश ठाकरे ( 8007172073) हर्षल क्षिरसागर (7066916570), भास्कर मुळे (7249232813), स्वप्नील गोंड (7757911327), चंदन परसूटकर (9970770132), वर्षा घटे (7066703736) रुचिता आंबेकर (8552925066), शितल बोरकर (9552596479), श्रुती घटे (9403908274), भाग्यश्री मेश्राम (9156076952) यांच्याशी संपर्क साधावा.

निवड चाचणीचे नियम

01) U-17 वर्षांसाठी 13 / 09 / 2009 किंवा त्या नंतरचा जन्म असावा.

02) U-19 वर्षांसाठी 13 / 09 / 2007 किंवा त्या नंतरचा जन्म असावा.

03) खेळाडूने आधार कार्डची 03 प्रत झेरॉक्स व 03 पासपोर्ट फोटो सोबत आणणे अनिवार्य आहे


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.