नागपूर, ता. ८ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. बुधवार(ता.०६) रोजी शोध पथकाने ४० प्रकरणांची नोंद करून ३९,६००/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत २० प्रकरणांची नोंद करून ८,०००/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400/-दंड) या अंतर्गत ०४ प्रकरणांची नोंद करून १,६००/- रूपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत ०३ प्रकरणांची नोंद करून ६,०००/-रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत १३ प्रकरणांची नोंद करून १२,०००/- रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने रस्ता,फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०२ प्रकरणाची नोंद करून रू.२,०००/- चे दंड वसुल करण्यात आले. सार्वजनिक रस्ता,फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत ०२ प्रकरणाची नोंद करून रू.६,०००/- चे दंड वसुल करण्यात आले. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास १५ प्रकरणांची नोंद करून ३,०००/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ०१ प्रकरणांची नोंद करून रु.१,००० /- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. राही घरगुती भोजनालय यांनी रस्ता / अनधिकृत जागी उरलेले अन्न टाकल्यामुळे रू.५,०००/- चे दंड वसूल करण्यात आले.तसेच मे.रामस्वर इन्फ्रा यांनी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रू.5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. सैर राज वर्क व रोहित आयरॉन बिल्डर्स यांनी बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे प्रत्येकी रू.१०,०००/- या प्रमाणे रू.२०,०००/-चे दंड वसूल करण्यात आले. हनुमान नगर झोन अंतर्गत मे.श्रीराम टॉवर्स यांनी बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.१०,०००/- नेहरूनगर झोन अंतर्गत मे. गॅलेक्सी अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.१०,०००/- रूपयांची वसुली करण्यात आली. गांधीबाग झोन अंतर्गत मे.साई डिस्पोजल व मे.लक्ष्मी किराणा स्टोर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रू.५,०००/-या प्रमाणे रू.१०,०००/-चे दंड वसूल करण्यात आले.सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे.ओम किराणा स्टोर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.५,०००/- चे दंड वसूल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत योगेश शर्मा यांच्यावर फुटपाथ वर अनधिकृतरित्या टीन शेड उभारल्याबद्दल रू.५०००/- कारवाई करण्यात आली. उपद्रव शोध पथकाने १० प्रकरणांची नोंद करून रू.७०,०००/- दंड वसूल केला.




