नागपूर :- सिरसपेठ तेलीपुरा येथील हनुमान मंदिरातून शिवशक्ती नागाब्दार स्वामी सेवा मंडळ व नवयुवक हनुमान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कपालेश्वर महादेव कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी या कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ झाला. यावेळी किर्तन, फळवाटप व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ढोल- ताशे, भजन व जयघोषाच्या गजरात कावडधारी शिवभक्तांनी सिरसपेठ तेलीपुरा येथील हनुमान मंदिरातून तुळशीबाग, महाल येथील कपालेश्वर महादेव मंदिरापर्यंत कावड यात्रा काढली. संपूर्ण मार्गावर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने वातावरण शिवमय झाले होते. कपालेश्वर महादेव मंदिरात पोहोचल्यानंतर कावडधारी शिवभक्तांनी विधिवत पूजन व महादेवाचा अभिषेक केला. यानंतर कडई व प्रसादाचे आयोजन करण्यात आले. कावड यात्रेत सहभागी झालेल्या सर्व कावड यात्रेकरूंसह शिवभक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक उपक्रमाच्या आयोजनासाठी शिवभक्त प्रशांत मोटघरे, दिलीप माखाडे, प्रकाश तांदुळकर, राजू तितरे, भगवान नरड, सुनील नांदुरकर, अरविंद शेंडे, किशोर पेटकर व प्रभू रणदिवे यांच्यासह सिरसपेठ परिसरातील महिला व पुरुष शिवभक्तांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मोरया फांऊन्डेशनची संस्थापिका रजनी चौहान, सारिका नांदुरकर, प्र.क्र. १८ च्या नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण समिती सभापती मनपा, यांची उपस्थिती होती. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी शिवभक्तीन चित्रा मोटघरे, नितू ठाकूर, कुंदा हिंगणकर, माधुरी आष्टणकर, वर्षा आकरे, छाया मलेवार, चंदा चकोले, सुनीता शेंडे व राणी गायधने यांच्यासह परिसरातील महिला शिवभक्तांनी सहकार्य केले. या कावड यात्रेला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सिरसपेठ तेलीपुरा येथे कपालेश्वर महादेव कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ









