– प्राथमिक यंत्रणा उपलब्ध, फायर सेफ्टी प्रमाणपत्र मात्र नाही
बेला :- अमरावती येथील रुग्णालयातील अग्नीतांडवाचे घटनेनंतर बेला प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करण्यात आली. तेव्हा सदर आरोग्य केंद्रात आगसुरक्षा प्रमाणपत्र नसून फायर ऑडिट व मॉक ड्रिल सुद्धा झाले नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. मात्र,आगीचे आकस्मिक प्रसंगी संकटातून वाचण्यासाठी प्राथमिक यंत्रणा उपलब्ध असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भंडारी यांनी सांगितले.
येथे आपत्कालीन मार्ग, व प्रकाश व्यवस्था, अलार्म,रुग्णांना स्थलांतरित करण्याची यंत्रणा, प्रशिक्षित कर्मचारी, फायर एक्स्ट्रीमग्वीशर, वाळूच्या बकेट अशा प्राथमिक यंत्रणा असल्याने बचाव कार्य करणे शक्य असल्याचे सांगण्यात आले.आरोग्य केंद्राची इमारत जुनी आहे. तरीपण येथे वैद्यकीय उपकरणाची सुरक्षा आहे.एक महिन्यापूर्वीच इलेक्ट्रिक सेफ्टी तपासणी झाली आहे. उपकरण, व वायरिंग सुद्धा चांगली आहे.

प्रवेशद्वाराशिवाय मागील बाजूने दोन आपत्कालीन वेगवेगळे मार्ग सुद्धा येथे उपलब्ध आहे. मात्र,फायर हायड्रंट,स्मोक डिटेक्टर व स्प्रिंकलर यासारख्या आधुनिक यंत्र सुरक्षा यंत्रणा नाही.शासनाकडून त्या मिळाव्या. अशी रुग्णांनी अपेक्षा व्यक्त केली. फायर ऑडिट आणि प्रमाणपत्राचा अभाव लक्षात घेता आरोग्य केंद्राची अग्नि सुरक्षा व्यवस्था अत्याधुनिक करण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रतिक्रिया :- इलेक्ट्रिक वायरिंगची तपासणी झाली असून उपकरणे आणि इतर यंत्रणा सुस्थितीत आहे. केंद्राचे मागील बाजूने दोन आपत्कालीन मार्ग सुद्धा उपलब्ध आहे.अत्याधुनिक अग्नि सुरक्षा यंत्रणा मिळाली तर आगीवर त्वरित नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे.
डॉ. भंडारी वैद्यकीय अधिकारी.








