spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भारतीय बँकिंग प्रणाली विषयावर मार्गदर्शन

कामठी :- सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालय,कामठी येथे अर्थशास्त्र विभागाच्या वतीने दि. 22 ऑगस्टला “भारतीय बँकिंग प्रणाली” या विषयावर विद्यार्थ्यांकरिता उद्बोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. युनियन बँक ऑफ इंडिया, कामठी शाखेच्या शाखा व्यवस्थापिका नीलिमा रामटेके यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य व्ही.बी.वंजारी ,पर्यवेक्षक नरेंद्र मेंढे , विभाग प्रमुख डॉ. किरण पेठे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा.पंकज वाटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. हिना कौसर यांनी अथक परिश्रम घेतले.

Popular Articles