spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ग्रामपंचायत कार्यालय बाबदेव येथे समाधान करणाऱ्या दिवशी सर्वच विभागातील अधिकारी गायब! 

किशोर साहू :मौदा ,ता. ८: गावातील नागरिकांच्या समस्या प्रलंबित न राहता गावातच सोडविण्यासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून व जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या आदेशान्वये आठवड्यातील प्रत्येक बुधवारला प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात समाधान दिवसाचे आयोजन करण्यात येते. महसूल विभाग, कृषी विभाग सह इतर विभागातील गाव पातळीवरील अधिकारी वर्ग उपस्थित राहून नागरिकांच्या समस्यांचे समाधान करतात. मात्र बुधवार( दि. ०६ ऑगस्ट) ला तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय बाबदेव येथे सर्वच विभागातील अधिकारी वर्ग गायब दिसले, त्यामुळे सकाळी सव्वा अकरा दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयाच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. याबाबत ग्रामपंचायत बाबदेव येथील सचिव स्मिता देवके यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, समाधान दिवस हे महसूल विभागातर्फे आयोजित करण्यात येते.महसूल विभागातील तलाठी  सहारे यांच्याकडे बाबदेव व नाना देवी या दोन हलक्यांच्या प्रभार असल्याने मागच्या बुधवारी 30 जुलैला बाबदेव येथे समाधान दिवस आयोजित केला होता. त्यामुळे या बुधवारी त्यांनी नानादेवी येथे समाधान दिवस आयोजित केल्याने बाबदेवला या बुधवारला समाधान दिवस घेण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Popular Articles