spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर जिल्हयातील ३ पेट्रोलियम प्लान्टने पोलीस व औद्योगिक विभागाचे समन्वयातून राबविली लेवल ३ ऑफ साईट मॉकड्रिल

 

नागपूर ८ :  दिनांक ०७/०८/२०२५ चे ११:०० वा. दुधा एमआयडीसी बोरी परिसरात लेवल ३ ऑफ साईट मॉकड्रिल आयोजित केलेली होती सदर मॉकड्रिल इंडियन ऑईल LPG बॉटलिग प्लान्ट दुधा एमआयडीसी बोरी, भारत पेट्रोलियम डेपो बोरखेडी एमआयडीस बोरी व इंडियन ऑईल LPG बॉटलिग प्लान्ट खापरी या प्लान्टच्या पदाधिका-यांनी पोलीस विभाग, औद्योगिक सुरक्षा विभाग व अग्नीशमन विभागाचे समन्वयातून संयुक्तीकरित्या राबविलेली आहे. सदर मॉकड्रिल मध्ये पोलीस विभागाचे  दिपक अग्रवाल (भापोसे) उपविभागीय पोलीस अधिकारी नागपूर विभाग नागपूर,  प्रतापराव भोसले ठाणेदार बोरी  प्रमोद भोंगे जिल्हा विशेष शाखा  राजेन्द्र पाटील सुरक्षा शाखा हे दहशतवाद विरोधी शाखा, सुरक्षा शाखा, नक्षल शाखा, पोलीस ठाणे बेला व एमआयडीसी बोरी, येथील पोलीस स्टाफसह उपस्थित होते तसेच वर नमुद पेट्रोलियम प्लान्टचे पदाधिकारी  वॉम्शी कीष्णा सिनियर मॅनेजर,  सौरभ तिवारी सुरक्षा अधिकारी इंडियन ऑईल LPG बॉटलिग प्लान्ट दुधा एमआयडीसी बोरी,  अंकित तिवारी सिनियर प्लान्ट मॅनेजर  रोहीत सोनकुसरे सुरक्षा अधिकारी इंडियन ऑईल LPG प्लान्ट खापरी  कन्हैयालाल सुरक्षा अधिकारी भारत पेट्रोलियम LPG बॉटलिग प्लान्ट टाकडघाट, एआयडीसी बोरी  मनिष भगत सुरक्षा अधिकारी भारत पेट्रोलियम डेपो बोरखेडी एमायडीसी बोरी हे प्लान्टचे सुरक्षा रक्षक व सामुग्रीसह हजर होते.

Popular Articles