spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रात्र गस्त दरम्यान कोबींग ऑपरेशन राबवुन केले रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक आणि नाकाबंदी करून तपासली वाहने

 

नागपूर ८ : दिनांक ०६/०८/२०२५ चे २३:०० वा. ते दिनांक ०७/०८/२०२५ चे ०५:०० वा. दरम्यान जिल्हा गस्त मध्ये  दिपक अग्रवाल, सहा पोलीस अधिक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी, नागपूर विभाग यांनी संपुर्ण जिल्हयात सतर्कपणे गस्त केली. तसेच पोलीस स्टेशन बोरी अंतर्गत बोरी टाउन येथे पायदळ पेट्रोलींग करून कोबींग ऑपरेशन राबविण्यात आले. सदर कोबिंग ऑपरेशन  दिपक अग्रवाल यांच्या नेतृत्वात राबविण्यात आले असुन रेकॉर्डवरील गुन्हेगार, जेल रिलीज गुन्हेगार, निगराणी बदमाश तसेच अवैध दारू विक्रेते गुन्हेगार चेक करून त्यांचे घराची पंचासमक्ष घरझडती घेण्यात आली. गार्डन चौक येथे नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान संशयीत वाहनांची तपासणी करण्यात आली. सदर कारवाईमध्ये बोरी पोलीस स्टेशन सह दंगा नियत्रंण पथकाचे अंमलदार हजर होते.

Popular Articles