spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्वामी विवेकानंद नगरात हनुमान मंदिरात महापुजा

कन्हान :- श्रावण शुक्ल पक्ष एकादशीच्या पावन पर्वा निमित्त शहरातील स्वामी विवेकानंद नगर येथील श्री हनुमान मंदिरात भक्तिमय वातावरणात महापुजेचे आयोजन करण्यात आले. गावकरी महिला तसेच मातोश्री भजन मंडळाच्या सहकार्याने विधिवत पूजा-अर्चना करण्यात आली.

नवीन दांपत्य सचिन चकोले व चेतना चकोले यांनी महापुजेत सहभागी होऊन श्री हनुमानाचे दर्शन घेतले. पूजा-अर्चना दरम्यान भक्तिमय भजनांनी परिस र दुमदुमून गेला. भाविकांनी श्रद्धा व भक्तिभावाने महा पूजेत सहभाग घेतला. महापुजा यशस्वी करण्यासाठी मातोश्री भजन मंडळाच्या अध्यक्षा वनिता कावळे, उपाध्यक्षा रंजनाताई भोयर, उषा बंड, लता उन्हाळे, सुनीता वाडीभस्मे, वैष्णवी भोयर, शारदा शिवरकर, उर्मिला चचाने, कुसुम मेरकुटे, शकुन पाहुणे, कविता, मंगला भोयर, रेखा नागपुरे, सुनंदा कटाने, नवीन यादव आदी महिला उपस्थित होत्या. श्रावणातील पवित्र वातावरणात झालेल्या या महापूजेमुळे विवेकानंद नगर परिसरात भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Popular Articles