कामठी :- घराजवळ किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करून त्याला जखमी केल्याची घटना नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.जख्मि तरुणाचे नाव नासिर शेख नाजीर वय 20 वर्षे रा अब्दूलाह शाह नगर कामठी असे आहे.ही घटना काल रात्री साडे दहा च्या सुमारास घडली या संदर्भात जख्मि ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .आरोपीचे नाव ताज अब्दुल अजीज वय 38 वर्षे व त्याचा भाऊ सद्दाम अब्दुल अजीज वय 32 वर्षे दोन्ही राहणार बाबा अब्दुलाह शाह नगर कामठी असे आहे. सदर दोन्ही आरोपीने बाबा फिर्यादीसोबत वाद घातला. वाद वाढल्यानंतर सद्दाम याने फिर्यादीला पकडून ठेवले, तर ताज अब्दुल अजीज याने चाकूने त्याच्या गळ्यावर वार केला. मात्र, फिर्यादीने प्रसंगावधान राखून माघार घेतल्याने त्याच्या गळ्याला किरकोळ दुखापत झाली.
दरम्यान, आरोपींनी फिर्यादीने किरकोळ वादाचा जाब विचारत त्याच्याशी हातबुक्की करून मारहाण केले.
या घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११०, ११५(२), ३(४) अन्वये गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.





