spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शेतजमिनीच्या व्यवहारात 46 लक्ष 63 हजाराचा ‘खेळ’; विक्रीपत्राऐवजी दुसऱ्याच्याच नावे आममुखत्यारपत्र!

– ४6 लाख ६3 हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप; नवीन कामठी पोलिसांत तरुणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

कामठी :- शेतजमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात विश्वास संपादन करून 46 लाख 63 हजार रुपये स्वीकारल्यानंतर ठरल्याप्रमाणे जमीन खरेदीदाराच्या नावे न करता चक्क अन्य व्यक्तीच्या नावे नोंदणीकृत आममुखत्यारपत्र करून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी रतिराम शंकर मोटघरे (वय २४, रा. भोकरेदेव, पोस्ट अंबाडी, ता. कुही, जि. नागपूर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी , रविंद्र गुणाजी गेचूडे (वय ४०, रा. ल्हीगाव, ता. कामठी) यांनी लिहिगाव येथील मौजा रानमांगली परिसरातील खसरा क्र. ७७, प.ह.नं. २७ मधील १.१४ हेक्टर अर्थात सुमारे २.७५ एकर शेतजमिनीचा व्यवहार आरोपीसोबत झाला होता.

या व्यवहारासाठी नोटराईज शेतजमीन विक्रीचा करारनामा करण्यात आला. त्यानंतर आरोपीने तक्रारदाराकडून रोख रक्कम तसेच धनादेशाद्वारे तब्बल ४6 लाख 63000 रुपये स्वीकारले मात्र, रक्कम स्वीकारल्यानंतर ठरल्याप्रमाणे तक्रारदाराच्या नावे विक्रीपत्र करून देण्याऐवजी विनोद अंबादास सोनसर यांच्या नावे संबंधित शेतजमिनीचे नोंदणीकृत आममुखत्यारपत्र करून देण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे विश्वासाने केलेल्या व्यवहारातून आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे रवींद्र गेचूडे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारीची चौकशी केल्यानंतर नवीन कामठी पोलिसांनी आरोपी रतिराम मोटघरे याच्याविरुद्ध कलम ३१८(४), ३१६(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

शेतजमिनीच्या व्यवहारात लाखो रुपयांची रक्कम स्वीकारूनही विक्रीपत्र न करता अन्य व्यक्तीच्या नावे कागदपत्रे केल्याच्या या प्रकारामुळे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढिल तपास सुरू आहे


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.