spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महिला ब्रिगेडतर्फे जरीपटका येथे प्री-तीज सावन मेळा

– विविध स्पर्धांसह सिंधी संस्कृतीचे दर्शन; महिला सक्षमीकरणाचा संदेश

नागपूर :- किंग कोब्रा सोशल फाउंडेशनच्या महिला ब्रिगेडतर्फे जरीपटका येथील स्वामी संत सतरामदास धर्मशाळा सभागृहात प्री-तीज (सावन मेळा) कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. सिंधी समाजातील महिलांना एकत्र आणण्यासोबतच पारंपरिक संस्कृती आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन आयर्न लेडी व मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. सुनीता धोते, आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी मेघा कपूर, सोनम कपूर आणि डॉ. कमल सुशील चंदवानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे भेटवस्तू तसेच तुळशीचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.

सावन मेळ्यात महिलांसाठी रॅम्प वॉक, नृत्य स्पर्धा, बेस्ट ड्रेस, तंबोला, सावन झुला आणि क्विझ स्पर्धा आदी विविध उपक्रम घेण्यात आले. सहभागी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाचा आनंद लुटला. स्पर्धकांसाठी स्वागत भेटवस्तू तसेच रिटर्न गिफ्टचीही व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन आणि स्नेहभोजनाने झाला.

किंग कोब्रा सोशल फाउंडेशनच्या महिला ब्रिगेड प्रमुख रोमा बेलानी यांनी भविष्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याची घोषणा केली. तसेच महिलांना गृहउद्योगासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांना रोजगार व व्यवसायाच्या संधी मिळवून देणे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सिंधी समाजातील परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी तसेच समाजातील एकोपा मजबूत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महिला ब्रिगेडच्या सुमन लक्षवानी, जिया मनवाणी, शोभा बेलानी, किंजल सुशील भोजवानी आणि दीपल बेलानी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन निधी बलानी आणि बरखा मांखीजानी यांनी केले. कार्यक्रमासाठी दैनिक भास्कर, इन-बीसीएन, मेट्रो समाचार आणि समाचार किंग हे मीडिया पार्टनर होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.