spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या कल्पनेतून भंडारा पोलीस दलात ‘ई-दरबार’ संपन्न

हंसराज,भंडारा :- पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या प्रशासकीय समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या संकल्पनेतून ३१ ऑगस्ट २०२६ रोजी ‘ई-दरबार’ या विशेष ऑनलाइन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रणालीद्वारे पोलीस अधीक्षकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, ठाणे प्रभारी आणि अंमलदारांशी थेट संवाद साधला.

या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज उरलेली नाही. ऑनलाइन माध्यमातूनच ते आपल्या अडचणी अधीक्षकांसमोर मांडू शकतात. ‘ई-दरबार’मध्ये मांडलेल्या समस्यांवर संबंधित लिपिकांना तातडीने आणि विहित मुदतीत कार्यवाही करण्याचे निर्देश हसन यांनी दिले. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सत्राचे इतिवृत्त तयार करून केलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित कर्मचाऱ्याला दिली जाते. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे वेळेची बचत होत असून प्रशासकीय कामात गतिमानता आल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.