spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कन्हान मुख्य रस्त्यावरील फुटपाथ अतिक्रमण तात्काळ हटवा

– ज्येष्ठ नागरिक संघाचा नगरपरिषदेला इशारा; ७ दिवसांची मुदत

कन्हान :- मुख्य रस्त्यावरील पक्का फुटपाथ बांधण्यात आलेला असतानाही काही दुकानदारांकडुन साहित्य , बोर्ड तसेच बांधकाम साहित्य (वाळु, गिट्टी, विटा, दगड) फुटपाथ व रस्त्यावर ठेवण्यात येत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अतिक्रमणामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व शालेय विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यावरून जीव धोक्यात घालुन चालावे लागत आहे. यासंदर्भात ज्येष्ठ नागरिक संघ, कन्हान यांच्या वतीने कन्हान-पिपरी नगरपरिषदे च्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. फुट पाथ हा नागरिकांच्या सुरक्षित व मुक्त वापरासाठी अस लेला मूलभुत हक्क असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. निवेदनात महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ मधील कलम १६७, १६९ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ अन्वये कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या १९ जून २०२६ रोजीच्या ‘ मनियार इलियाझ ’ प्रकरणातील आदेशाचा संदर्भ देत फुटपाथ मोकळा ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.अति क्रमण तात्काळ हटवुन फुटपाथ नागरिकांसाठी खुला करावा, अन्यथा ७ दिवसांनंतर उपविभागिय अधिकारी रामटेक तसेच उच्च न्यायालय, नागपुर खंडपीठ येथे याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा ज्येष्ठ नागरिक संघाने दिला आहे. निवेदनावर संघाचे सचिव प्रकाश नाईक यांची स्वाक्षरी असुन अध्यक्ष पी. डी. जयस्वाल, उपाध्यक्ष नारायण गजभिये सदस्य दामोदर बंड, रमेश चव्हाण, छगन वानखेडे, केशव चौधरी, रफिक शेख, बालाजी नायर, किशोरी अरोरा व महेंद्र चव्हाण आदी सदस्यांनी मागणी केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.