spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

परिवहन समितीच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी

नागपूर :- मनपाच्या परिवहन समितीची बैठक सभापती मंगला खेकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.०१) पार पडली. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत परिवहन समितीचे उपसभापती सुधीर(बंडू) राऊत, सदस्य विजय होले, सदस्या अर्चना पडोळे, रुपाली ठाकूर, प्रमिला मथरानी, मंगला मस्के, पूजा पाठक, सदस्य शैलेश पांडे, दिनेश यादव, शकील पटेल यांच्यासह परिवहन व्यवस्थापक मिलिंद मेश्राम, परिवहन प्रशासकीय अधिकारी योगेश लुंगे, व्यवस्थापक ऑपरेशन राजीव घाटोळे, व्यवस्थापक ऍडमिन गजानन नागूलवार, लेखाधिकारी चौलवार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ आणि घरभाडे भत्ता, बस चालक-वाहकांसाठी मोफत स्मार्ट स्वच्छतागृह, ‘देवदर्शन यात्रा बस सर्किट’चा शुभारंभ तसेच जुन्या स्क्रॅप बसेसच्या विल्हेवाटीबाबतचे निर्णय घेण्यात आले आहेत.

यात शासन अधिसूचना दिनांक १४/१०/२०२४ नुसार कंत्राटी सहाय्यक, मेंटेनन्स व ऑपरेशन कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ सुचवण्यात आली आहे. तसेच डिझेल बस ऑपरेटरच्या मूळ किलोमीटर दरात रू ४.११ प्रति किमी वाढ आणि पीएमआय कर्मचाऱ्यांकरिता वाढ तसेच घरभाडे भत्ता सुमारे १ हजार ८८० वाहक कर्मचाऱ्यांना ‘महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता कायदा, १९८३’ नुसार दरमहा सुमारे रू ९५२- इतका एचआरए प्रस्तावित करण्यात आला आहे. हा विषय सूचनेसह मंजूर करण्यात आला.

याशिवाय मोर भवन डेपो-२ येथील स्मार्ट सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर बस चालक, वाहक व कर्मचाऱ्यांसाठी पूर्णपणे विनामूल्य (नि:शुल्क) करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूर शहर व परिसरातील प्रमुख धार्मिक व सांस्कृतिक स्थळांना जोडण्यासाठी (उदा. टेकडी गणेश, दीक्षाभूमी, मोठा ताजबाग, स्वामिनारायण मंदिर, कोरडी, चिचोली इ.) विशेष बस सेवा सुरू करण्यात येत आहे.

सद्यस्थितीत प्रायोगिक तत्त्वावर दररोज ८ तासांच्या ट्रिपमध्ये ‘Chalo Mobility Call Centre’ द्वारे ऑन-डिमांड आणि डिजिटल बुकींग करून ही सेवा शनिवार व रविवार (वीकेंडला) देखील उपलब्ध असणार आहे.

प्रस्तावित भाडे (८ तासांसाठी) :

   ४० आसनी बस: रू.७,०००/-

  ३० आसनी बस: रू.६,०००/-

  २५ आसनी बस: रू.५,०००/-

JnNURM योजनेअंतर्गत आयुर्मान पूर्ण झालेल्या एकूण ११४ स्क्रॅप बसेसपैकी विशेष कामांसाठी काही बसेस राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यातील ०२ बसेस ‘स्त्री महाशक्ती प्रकल्पाकरिता’ तर ०४ बसेस ‘कंटीन व सार्वजनिक हितास्तव’ राखीव ठेवण्यात येतील. उर्वरित १०८ स्क्रॅप बसेसची MSTC मार्फत ऑनलाइन ई-लिलाव (Online E-Auction) पद्धतीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून विल्हेवाट लावली जाईल.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.