spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

दिवाणी वाद प्रलंबित असताना मोक्का चौकशी, ७ सप्टेंबरच्या कार्यवाहीकडे लक्ष

– कळमेश्वर येथील जमिनीच्या वहिवाटीच्या रस्त्यावरून वाद

नागपूर/कळमेश्वर,प्रतिनिधी :- कळमेश्वर येथील मौजा कळमेश्वर, प.ह.क्र. २७, ता. कळमेश्वर, जि. नागपूर येथील सर्वे क्र. १९५/२, १९५/१ व १९६ या जमिनीच्या मालकी, ताबा आणि कथित वहिवाटीच्या रस्त्याच्या हक्कासंदर्भात वाद सुरू आहे. या प्रकरणी मा. दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, सावनेर यांच्या न्यायालयात नियमित दिवाणी दावा क्र. ४८/२०२४ (पुंडलीक विरुद्ध लीलाबाई) प्रलंबित आहे.या प्रकरणात प्रमोद पुंडलीक बांबल यांच्या मालकी व ताब्यासंदर्भात तसेच रोहित भास्कर सोनारे आणि राजेश्वर सोनारे यांच्याशी संबंधित हक्काच्या दाव्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, संबंधित जमिनीमधून वहिवाटीचा रस्ता असल्याचा दावा करीत रोहित भास्कर सोनारे व राजेश्वर सोनारे यांनी तहसीलदार, कळमेश्वर यांच्याकडे कार्यवाही सुरू केली आहे. या प्रकरणात महसूल विभागाकडून यापूर्वी २४ ऑगस्ट २०२६ रोजी मोक्का चौकशी निश्चित करण्यात आली होती. त्यास प्रमोद बांबल यांनी हरकत घेत २१ ऑगस्ट २०२६ रोजी लेखी निवेदन व संबंधित कागदपत्रे सादर केली होती. त्यानंतर तहसीलदार कार्यालयाकडून आता ७ सप्टेंबर २०२६ रोजी पुन्हा मोक्का चौकशी निश्चित करण्यात आली आहे. यामुळे दिवाणी न्यायालयात संबंधित मालमत्तेबाबत प्रकरण प्रलंबित असताना महसूल विभागाची चौकशी पुढे जाणार असल्याने या कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, २० ऑगस्ट २०२६ रोजी प्रमोद बांबल यांनी तहसीलदार, कळमेश्वर यांच्यासमोरील कार्यवाहीसंदर्भात त्याच दिवाणी दाव्यात तात्पुरत्या मनाईसाठी अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात आले. या अर्जावरील पुढील सुनावणी १६ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे. तसेच, १ ऑगस्ट २०२५ रोजी दिवाणी न्यायालयाने प्रमोद बांबल यांच्या बाजूने तात्पुरता मनाई आदेश दिल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. सदर आदेश सध्या लागू असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर ७ सप्टेंबर रोजी होणारी मोक्का चौकशी कोणत्या प्रक्रियेनुसार पुढे नेली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिवाणी न्यायालयातील प्रकरण आणि महसूल विभागातील कार्यवाही याबाबत संबंधित न्यायालयीन व प्रशासकीय प्रक्रियेनुसार निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोक्का चौकशीला हरकत घेणाऱ्या प्रमोद बांबल यांनी, त्यांच्या तात्पुरत्या मनाई अर्जावर निर्णय होईपर्यंत महसूल विभागाची मोक्का चौकशी स्थगित ठेवावी, अशी मागणी केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.