spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘आधार’ अपडेट न केल्यास मुलांचे रेकॉर्ड धोक्यात !

– शैक्षणिक सवलतींसह शासकीय योजनांच्या लाभावरही परिणाम होण्याची शक्यता; वयाची ५ व १५ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक अपडेट अनिवार्य

पंकज परशुरामकर, प्रतिनिधी नवेगाव बांध :- मुलांच्या शासकीय सेवा व शैक्षणिक सुविधांमध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांचे आधार कार्ड वेळेत अपडेट करून घेणे आवश्यक आहे. विशेषतः मुलांचे वय ५ आणि १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आधारमधील बायोमेट्रिक माहिती अपडेट करणे बंधनकारक असून, हे अपडेट न केल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व शासकीय रेकॉर्डवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

शाळेत प्रवेश, शिष्यवृत्ती तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये, यासाठी पालकांनी आपल्या पाल्याच्या वयाची ५ आणि १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बायोमेट्रिक अपडेट करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा स्तरावरही याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

गोंदिया जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक अपडेट करण्याबाबत विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्यास प्रथम आधार नोंदणी करून घेणे, तसेच आधार कार्ड असले तरी वयाच्या ५ व १५ वर्षांनंतर बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक आहे. आधार अपडेट न झाल्यास विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती, शालेय पोषण आहार योजना तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळताना अडचणी येऊ शकतात.

शालेय प्रवेश, शिष्यवृत्ती आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घेताना विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये, यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांच्या वयाची ५ आणि १५ वर्षे पूर्ण होताच बायोमेट्रिक अपडेट करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत शाळा स्तरावर जनजागृती केली जात आहे. काही अडचण असल्यास पालकांनी तालुका स्तरावरील आधार केंद्रातील मदत केंद्राशी संपर्क साधावा.

आधार अपडेट कुठे करावे ?

आधार अपडेट कुठे करावे ?

शिक्षकांचे प्रमाण वाढले असून तालुक्यातील किंवा शहरी भागातील अधिकृत आधार सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र मध्ये आधार अपडेटची सुविधा उपलब्ध आहे. आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास अडथळे येणार नाहीत. पालकांनी आधार अपडेटची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.