खापरखेडा :- विवेक पांडुरंग रोकडे यांची कार्यकारी संचालक (प्रकल्प) पदावर पदोन्नती झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता सेना संघटनेतर्फे गुरुवारी ३ सप्टेंबर रोजी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील ५०० मेगावॅट परिसरातील नारोबा-बारोबा मंदिरात रोकडे यांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चना करण्यात आली. पूजेनंतर रोकडे यांनी मंदिर व परिसराची पाहणी केली. यावेळी मंदिर परिसराच्या सौंदर्यीकरणाबाबत तसेच आवश्यक विकासकामांची माहिती त्यांनी घेतली. मंदिर परिसराच्या विकासासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यानंतर महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता सेना संघटनेतर्फे ‘झाडे लावा, झाडे जगवा – पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा’ या संकल्पनेतून नारोबा-बारोबा मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रोकडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी देखभाल नियोजन विभाग (MPD) चे प्रमुख अधीक्षक अभियंता शुक्ला यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या हस्तेही वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. विवेक रोकडे हे खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत असताना त्यांनी खापरखेडा येथील आझाद मैदान परिसरात सुमारे १५० ते २०० औषधी वनस्पतींची लागवड करण्याचा अभिनव उपक्रम राबविला होता. या ठिकाणीही त्यांनी भेट देऊन यापूर्वी लागवड केलेल्या झाडांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. त्यांच्या कार्यकाळात खापरखेडा परिसरात सुमारे २ हजार ते ३ हजार वृक्षांची लागवड करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. या कार्यक्रमास संघटनेचे कंत्राटी अध्यक्ष रमेश गणोरकर, केंद्रीय सहकार्याध्यक्ष (निर्मिती) मानकर, केंद्रीय उपसरचिटणीस (निर्मिती) विजय शास्त्रकार, खापरखेडा झोन अध्यक्ष के.पी. राठोड, झोन सचिव महेश बिराजदार, झोन कार्याध्यक्ष तेजस सोनवणे, अजय सोनकुसरे, नरेश तरारे, सिव्हिल विभागाचे सहाय्यक अभियंता धामणे यांच्यासह सिव्हिल विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी रोकडे यांनी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले. पर्यावरण संवर्धन ही सामूहिक जबाबदारी असून अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विवेक रोकडे यांचा पदोन्नतीबद्दल सत्कार; नारोबा-बारोबा मंदिर परिसरात वृक्षारोपण


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.




