spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दगड, वीटाने ठेचून गुंडाची हत्या

 

यशोधरानगरातील सकाळचा थरार

बेस बॉलच्या स्टीकने केले रक्तबंबाळ

मृतक अमलीपदार्थ विक्रीत होता सक्रीय

नागपूर, ८ : वर्चस्व आणि पैशाच्या देवान-घेवानी वरून झालेल्या वादात एका गुंडाची दगड, वीटाने ठेचून हत्या करण्यात आली. बेसबॉलच्या स्टीकनेही त्याचे डोके फोडले. रक्तबंबाळ आणि निपचित अवस्थेत तो तासभर पडून होता. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या लोकांची गर्दी झाली होती. माहिती मिळताच यशोधरानगर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश खूणे पथकासह घटनास्थळी पोहोचले. जखमीला मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. समीर उर्फ येडा समशेर खान (30) रा. राजीव गांधीनगर, असे मृतकाचे नाव आहे. ही थरार घटना गुरूवारी सकाळी 5 ते 5.30 वाजताच्या सुमारास राजीव गांधीनगरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मृतक समीर विवाहित असून त्याला एक मुलगी आहे. तो अमलीदार्थ विक्रीत सक्रीय होता. गैरमार्गाने त्याने चांगली रक्कम मिळविली होती. त्याच बळावर तो दादागिरी करायचा. मुख्य आरोपी अस्सू हा रेशन धान्याचा काळा बाजार करतो. दोघेही गैरमार्गाने पैसे कमवित असल्याने त्यांची मैत्री होती. दोघांचीही आर्थिक स्थिती भक्कम असल्याने ते पंटर ठेवत होते. त्यांची टोळी होती. दोघांचीही चलती असल्याने परिसरात लोक त्यांना घाबरायचे. मृतक आणि मुख्य आरोपी अस्सू यांच्यात अलिकडेच पैशाची देवान-घेवान झाली होती. यावरून दोन दिवसांपूर्वीच अस्सूने समीरशी वाद घातला होता. तेव्हापासूनच त्या दोघात धुसफुस सुरू होती.
आरोपी अस्सू हा समीरच्या मागावरच होता. गुरूवार 7 ऑगस्ट रोजी सकाळी 5 ते 5.30 वाजताच्या सुमारास समीर हा घरापासून हाकेच्या अंतरावर होता. त्याच्या पाळतीवर असलेल्या अस्सूने सोबत राहणाऱ्या पंटरला बोलावून घेतले. समीरला काही कळण्यापूर्वीच सहाही लोक त्याच्यावर तुटून पडले. बेस बॉलच्या स्टीकने त्याला रक्तबंबाळ केले. तो खाली पडल्यावर वीटा आणि दगडाने त्याला ठेचले. रक्तबंबाळ आणि निपचित अवस्थेत सोडून आरोपी पळून गेले. घटनास्थळी न्याय वैद्क  मोबाईल व्हॅनचे पथक पोहोचले. घटनास्थळवरून नमूने गोळा केले. वपोनि खुणे यांनी आरोपीच्या शोधासाठी विविध पथक तयार केले असून लवकरच त्यांच्या मुसक्या आवळल्या जातील.

लोकांनी पाहिले खिडकीतून
सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार समीरला दगड, वीटाचे ठेचत असताना काही लोकांनी घराच्या आतमधूनच (खिडकीतून) पाहिले. बाहेर निघण्याची कोणाचीच हंमत नव्हती. आरोपी पळून गेल्यानंतरही ते घराबाहेर पडले नाही. जवळपास तास ते दिड तास समीर घटनास्थळी पडून होता. लोक मॉर्निंग वॉकसाठी निघाले असता समीर निपचित पडून दिसला. जवळपासच्या लोकांची प्रचंड गर्दी झाली होती.

Popular Articles