spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

के. टी. नगर आरोग्य केंद्रातील मेडिकल ऑफिसर ग्रीष्मा धिंग्रा यांची तात्काळ बदली करा 

सोमवार पासून के.टी.नगर आरोग्य केंद्रातील सर्व आशा वर्कर व इतर सर्व स्टाफ काम बंद ठेवणार
नागपूर ८ : आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी आय टी यू) नागपूर तर्फे के. टी. नगर आरोग्य केंद्रातील मेडिकल ऑफिसर ग्रीष्मा धिंग्रा यांच्या कित्येक वर्षापासून असणाऱ्या जाचाला कंटाळून सर्व आशा वर्कर व सर्व स्टाफ यांनी एकत्रितपणे याचे आधी कित्येकदा महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी यांना शाब्दिक तक्रार दिली. परंतु त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. परंतु काल महानगर पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांना देण्यात आलेल्या तक्रारीवरून आज महानगर पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी तात्काळ सर्वांची मीटिंग बोलावून योग्य निर्णय घेण्याचा आदेश काढला. त्यामुळे सर्वांचा विश्वास बळावला आहे. संपूर्ण आशा वर्कर व इतर स्टाफ त्यांच्या वर झालेल्या जाचाला कंटाळून पुढे एकही दिवस त्यांच्यासोबत काम करायला तयार नाही असे सर्वांनी एकमताने सांगितले. त्यामुळे  तात्काळ आपल्या अधिकाराचा वापर करून व इतरांचे घेतलेले बयानाचा आदर करून मेडिकल ऑफिसर यांची तात्काळ बदली करून दुसऱ्या मेडिकल ऑफिसर ची नेमणूक करावी असे एकमतांनी उत्तर दिले. सर्वांनी घेतलेल्या भूमिकेनुसार तात्काळ निर्णय न घेतल्यास येत्या सोमवारपासून के.टी. नगर आरोग्य केंद्रातील काम करण्यावर सर्वांनी बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर तात्काळ निर्णय घेऊन योग्य मार्ग काढावा अशी अपेक्षा बाळगण्यात आली. शनिवार पर्यंत योग्य निर्णय न घेतल्यास सोमवारपासून सर्व आशिया वर्कर ए एन एम जी एन एम अकाउंटंट फार्मसी टेक्निशियन केटी नगर आरोग्य केंद्रातील काम ठप्प पाडतील अशी भूमिका घेण्यात आल्याचे पत्र आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन व आरोग्य विभाग कंत्राटी कर्मचारी संघटना (सी आय टी यू) नागपूर चे अध्यक्ष काँ. राजेंद्र साठे यांनी अशी सूचना एका पत्रका द्वारे केली. आजच्या भेटी दरम्यान अध्यक्ष काँ. राजेंद्र साठे, महासचिव कॉ. प्रिती  मेश्राम उपाध्यक्ष काँ. माया कावळे प्रामुख्याने उपस्थित होते.

Popular Articles