किशोर साहू, मौदा :- आजच्या परिस्थितीत शिक्षकीपेक्षा म्हणून काम करणं खूप कठीण आहे .अपेक्षाच एवढं ओझ आहे की त्या अपेक्षाचं ओझं वाहत असतानी शिक्षक कधीतरी खचत असतो, तरीसुद्धा दिलेले काम न डगमगता , काम करत असताना सर्वांकडून सहन करण्याची क्षमता असलेल्या शिक्षकांना मानाचा मुजरा. आजची परिस्थिती बघता ऑनलाइन, ऑफलाइन काम करत असताना कितीही काम असले तरी विद्यार्थ्यांसमोर आनंदात हसत खेळत दहा ते पाच मध्ये काम करीत असताना चेहऱ्यावर मात्र दुःख दिसू देत नाही. शिक्षकांची संख्या कमी होत आहे .शिक्षक सेवानिवृत्त होत आहे, तरीसुद्धा व्यवस्थित वर्गाचे नियोजन करून आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यासात मागे नाही राहिले पाहीजे म्हणून शिक्षक नेहमी काळजी घेत असतात. आजच्या कालावधीत शिक्षणा व्यतिरिक्त जनगणना, निवडणूक, बीएलओ, एसआयआर, निरक्षर,विविध उपक्रमाचा भडीमार होत असताना आमचे शिक्षक, पालकांशी व्यवस्थित संबंध ठेवून गाव पातळीवरील, पदाधिकारी,अधिकारी यांना विश्वासात घेऊन काम करणाऱ्या शिक्षकावर एवढे मोठे बंधन असताना सुद्धा हसत खेळत ज्ञानाचं ज्ञानार्जन करणाऱ्या व विद्यार्थ्यांना ज्ञान देणाऱ्या शिक्षक अभिमानास्पद पात्र आहे. प्रत्यक्ष शाळेत गेल्यानंतर विद्यार्थ्यांचे चित्र डोळ्यासमोर दिसल्यानंतर विद्यार्थाना कामी लावल्यानंतर सुद्धा आपल्या ऑफिस मधील काम, मुख्याध्यापकाची जबाबदारी, लिपिकाची जबाबदारी, चपराशी यांची सुद्धा जबाबदारी, स्वयंपाक झाल्यानंतर पहिली चव घेणाची जबाबदारी अशा एक ना अनेक जबाबदाऱ्या शिक्षक सांभाळत असतात. शिक्षकांची जबाबदारी खूप मोठी आहे, शिक्षकांना त्यांची जाणीव सुद्धा माहित आहे.आजच्या परिस्थितीचे चित्र मनाला खुप यातना देतात तरीसुद्धा शिक्षक डगमगत नाही, ठामपणे उभा राहतो असे सर्व गुणसंपन्न शिक्षक कौतुकास पात्र आहे. ज्या देशात शिक्षकांचे प्रश्न राहत नाही तो देश निश्चित प्रमाणात सुजलाम सुफलाम आणि एक आदर्श देश म्हणून गणल्या जाते. सर्व शिक्षकांनी आपल्या पेशाबद्दल आदर राखावा आणि सर्वांनी संघटित होऊन शिक्षकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. शिक्षकांनी एकत्र आले तर निश्चित प्रमाणात आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय राहणार नाही . संघटन शक्ती मध्ये ताकद आहे. त्यामुळे आज शिक्षक दिनी सर्व शिक्षकांनी एकजुटीचा संकल्प करावा, असे आव्हान आज दहेगाव येथील पीएम श्री उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी ज्ञानार्जनाचे प्रामाणिक काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना केले आहे.
शिक्षकदिनी सर्व शिक्षकांनी एकजुटीच्या संकल्प करा: मुख्याध्यापक वासुदेव भूते


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.




