spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भारतीय परंपरेनुसार इनरव्हील डिस्ट्रिक्ट 303 च्या डिस्ट्रिक्ट चेअरमनचे स्वागत श्रावणातील पारंपरिक पद्धतीने औक्षण व ओटी भरून सन्मान; OCV मध्ये पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा घेतला आढावा

नागपूर :- इनरव्हील क्लब ऑफ नागपूर ऑरेंज सिटीच्या वतीने ईनर व्हिल डिस्ट्रिक्ट 303 च्या चेअरमन यांच्या अधिकृत भेटीचे (Official Chairman Visit – OCV) आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन करण्याचा संदेश देत श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर ड्रिस्टीक चे चेअरमन मनीषा चौधरी यांचे अनोख्या पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. श्रावण महिन्याचे औचित्य साधून आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलेल्या पाळण्यात चेअरमन यांना बसवून त्यांचे औक्षण करण्यात आले. तसेच पारंपरिक पद्धतीने ओटी भरून त्यांचा सन्मान करण्यात आला. या आगळ्या आणि संस्कृतीशी जोडलेल्या स्वागतामुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले. क्लबच्या सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेत भारतीय संस्कृतीतील परंपरांचे सुंदर दर्शन घडविले. OCV च्या निमित्ताने आयोजित बैठकीची सुरुवात डिस्ट्रिक्ट चेअरमन मनीषा चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. दीपप्रज्वलनानंतर क्लबच्या विविध उपक्रमांचा, सामाजिक कार्याचा तसेच वर्षभराच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. क्लबच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपापल्या जबाबदाऱ्या आणि कार्याची माहिती सादर केली. पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर मनीषा चौधरी यांनी क्लबच्या कामकाजा बद्दल समाधान व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी जपत क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे पाहून त्यांनी पदाधिकारी व सदस्यांचे कौतुक केले. भविष्यातही समाजोपयोगी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. या अधिकृत भेटी दरम्यान क्लबच्या विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेण्यात आली. सदस्यांचा सहभाग, उपक्रमांचे नियोजन, सामाजिक कार्य आणि क्लबच्या पुढील वाटचालीबाबतही चर्चा करण्यात आली. OCV च्या माध्यमातून क्लबच्या कार्याला अधिक दिशा मिळण्यास मदत झाली. यावेळी डिस्ट्रिक्ट आय एस ओ स्वाती वानकर यांचीही विशेष उपस्थिती होती. तसेच क्लबच्या पास्ट प्रेसिडेंट, विविध पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक स्वागत, दीपप्रज्वलन, कार्याचा आढावा आणि मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांनी OCV कार्यक्रम उत्साहात आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. इनरव्हील क्लब ऑफ नागपूर ऑरेंज सिटीच्या या उपक्रमातून आधुनिक सामाजिक कार्यासोबत भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करण्याचा सुंदर संदेश देण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.