किशोर साहू, मौदा :- पीएमश्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चाचेर येथे भारताचे माजी राष्ट्रपती, महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगणारी भाषणे, कविता, गीत व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांबद्दल व्यक्त केलेल्या भावना आणि शुभेच्छांमुळे कार्यक्रमाला विशेष भावनिक व आनंददायी वातावरण लाभले.
यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे स्थान, शिक्षणाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांनी चांगले संस्कार आत्मसात करून जबाबदार नागरिक बनण्याची गरज याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जीवन यशवंत सहारे, मुख्याध्यापक अनिल गडपायले, शिक्षक रवींद्र घुगे, भारती साखरकर, परवीन शेख,प्रीती खंगार, शिल्पा उकुड्डे, नेहा निमजे, रुचिला खंडाईत, संगीता बालकोटे तसेच शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्साह, आनंद आणि शिक्षकांप्रती कृतज्ञतेच्या भावनेत हा शिक्षक दिन सोहळा संपन्न झाला.





