spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वैज्ञानिकतेसह आध्यात्मिक विचार सांभाळणारे विद्यार्थी देशात निर्माण करणे शिक्षकांची जबाबदारी – मुख्याध्यापक विकास धारगावे

किशोर साहू, मौदा :- शाळा व शिक्षक हे देश व नागरिक घडविणारे मंदिर व कोहिनूर हिरे आहेत. देशासाठी सोनियाच्या चिडियांना तयार करण्याचे कार्य शिक्षक करतात. भारतीय समाजाच्या विकासात शिक्षकाची भूमिका अग्रगण्य असून कोणताही राष्ट्र किंवा सभ्य समाज शिक्षकाविना प्रगती करू शकत नाही. देशास प्रगतीपथावर आरुढ करण्यास्तव वैज्ञानिक, अध्यात्मिक गुणसंपन्न शिक्षकांची गरज आहे .शिक्षक हा भारतीय समाजाच्या सर्वात मोठा देवता असून ब्रह्मा, विष्णू महेश या त्रिशक्ती पेक्षाही महान आहे. वैज्ञानिकतेसह आध्यात्मिक विचार सांभाळणारे विद्यार्थी देशात निर्माण हे शिक्षकांची जबाबदारी असून, असे विद्यार्थी निर्माण करण्याचा प्रयत्न मी मागील 26 वर्षापासून करीत असून, प्रत्येक शिक्षकाने असे विद्यार्थी निर्माण करावे असे आव्हान आज शिक्षकदिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा घोटमुंढरी येथील मुख्याध्यापक विकास धारगावे यांनी ज्ञानार्दजनाचे प्रामाणिक कामे करणाऱ्या शिक्षकांना केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.