spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

“स्व.निर्धन पाटील वाघाये महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न”

हंसराज, भंडारा लाखनी :- स्थानिक स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालय, लाखनी येथे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात ‘स्वयंशासन’ उपक्रम राबविण्यात आला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांची व प्रशासनाची भूमिका यशस्वीपणे पार पाडली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुधाकर शेंडे आणि प्रा. मनीषा सपाटे उपस्थित होत्या. या दिवशी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा कारभार स्वतःच्या हाती घेतला होता. यामध्ये रोशनी रहांगडाले हिने ‘प्राचार्य’ म्हणून महाविद्यालयाची धुरा सांभाळली, तर दुर्गा दखने हिने ‘पर्यवेक्षक’ म्हणून जबाबदारी पार पाडली. वेदांती बोरकर, मानसी उके, सेजल नान्हे, धनश्री लांडगे, नंदिनी बाभरे, भावना नान्हे आणि तृप्ती भांडारकर यांनी ‘शिक्षक’ बनून वर्गांवर अध्यापनाचे कार्य केले.

‘विद्यार्थी प्राचार्य’ रोशनी रहांगडाले हिने आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्य पदाचा अनुभव कथन केला. तर दुर्गा दखने हिने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

मार्गदर्शन करताना डॉ. सुधाकर शेंडे म्हणाले की, “गुरुविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई सन्मान. आई-वडील आपल्याला जन्म देतात, पण समाजात कसे जगावे आणि काय योग्य-अयोग्य आहे याचे भान शिक्षकच करून देतात.” प्रा. मनीषा सपाटे यांनी ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु…’ हा श्लोक उद्धृत करत शिक्षक दिनाचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व पटवून दिले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. गणेश कापसे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, “शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान देणारे नसून विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजवणारे शिल्पकार आहेत. ते व्यक्तिमत्त्वाचा विकास करून आपल्याला एक सुजाण नागरिक बनवतात. अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे कार्य गुरुच करत असतात.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबिका वाघाये हिने केले, तर आभार प्रदर्शन रिया रामटेके हिने मानले. या कार्यक्रमाला स्मिता तितरमारे, प्रा. ज्ञानेश्वरी रहांगडाले, प्रा. येसोमती कागदे, प्रा. श्रद्धा बोरकर, डॉ. अनुराधा खाडे, प्रा. मंगेश कुकडे, प्रा. मुनेश्वर हलमारे, डॉ. सुधीर सहारे, डॉ. मंगेश वंजारी, प्रा. प्रमोद भोयर व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होता. ‘वंदे मातरम’च्या गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.