spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सिंगोरी फाट्यावर डोडा भुकटीचा साठा जप्त; १३.६१ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

हंसराज भंडारा :- अमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध भंडारा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सिंगोरी फाट्यावरील एका राजस्थानी ढाब्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) अमली पदार्थ विरोधी पथकाने धाड टाकून १३ लाख ६१ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी राजस्थान येथील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबर रोजी कारधा पोलीस हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना, राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील सिंगोरी फाट्याजवळ असलेल्या ‘राजस्थानी ढाब्यावर’ छुप्या पद्धतीने अमली पदार्थांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथकासह ढाब्यावर धाड टाकली.

या कारवाईत आरोपी चुन्नीलाल रामरथ राम (वय ४० वर्षे, रा. पल्ली, जि. जोधपूर, राजस्थान; ह.मु. सिंगोरी फाटा) याच्या ताब्यातून ३.०१६ किलो शुद्ध ‘डोडा भुकटी’ , एक चारचाकी वाहन , दोन जुने मिक्सर, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि दोन अँड्रॉइड मोबाईल असा एकूण १३ लाख ६१ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध कारधा पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक ६९४/२०२६ अन्वये एनडीपीएस ॲक्ट कलम ८(क), १५(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. लांडे, पो.हवा. महाजन, पो.हवा. बोरकर, पो.ना. पडोळे, पो.शि. आरीकर, पो.शि. घोलपे आणि अमली पदार्थ विरोधी पथक (स्था.गु.शा. भंडारा) यांनी केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास कारधा पोलीस करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.