spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे शिक्षक दिनाचा कार्यक्रम, तसेच दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात

किशोर साहू, मौदा :- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून मोठा थाटामाटात साजरा करण्यात येतो.पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे आजच्या दिवशी विद्यार्थ्यांना स्वयंशासन या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शिक्षक बनुन अध्यापनाचे कार्य केले.आजच्या दिवशी शाळेच्या मुख्याध्यापक म्हणून अवनी श्रीकृष्ण आंबिलढुके या विद्यार्थीनीनी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार उत्कृष्टपणे पार पडला.

सुरुवातीला डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेचे मुख्याध्यापक वासुदेव भुते यानी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्रावर आधारित विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून का साजरा करण्यात येतो याची सर्व माहिती विद्यार्थ्यांना सांगितले . या कार्यक्रमाचे संचालन शिक्षक सुधीर कांबळे यांनी केले.

यानंतर आजच्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला. काही मुले श्रीकृष्ण म्हणून व काही मुली राधा च्या वेशभूषात आल्या होत्या. मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी राधा व श्रीकृष्ण यांच्या जोडीचे पूजन. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विद्यार्थ्यांनी विविध नृत्य केले,दहीहंडी फोडण्यात आली.विद्यार्थ्यांना काला देण्यात आला. दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद सुधीर खंडाईत, सुधीर कांबळे , राजेश रोहाड ,सुजाता बोधले , प्रज्ञा रामटेके, संगीता कारेमोरे, ज्योती आंबिलढुके,उमेश उके, पुष्प लता उके, यानी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमाचे आभार शिक्षक राजेश रोहाड यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.