बेला :- ब्रम्हाकुमारीज उपसेवा केंद्र सिर्सी ये रक्षाबंधन कार्यक्रम आध्यामिक व आनंदमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. यातून त्यांनी प्रवित्रता,प्रेम,शांती आणि सद्भावनेचा संदेश दिला.
रेखा दीदी यांनी रक्षाबंधनाचे महत्व सांगून रक्षा सूत्र बाधले. त्यांनी रक्षाबंधन हे केवळ भाऊ बहिणीच्या नात्यापुरते मर्यादित नसून, परमात्माच्या स्मरणातून जीवनात पवित्रता, शांती, प्रेम आणि श्रेष्ठ संस्कार करण्याचा संकल्प असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव नाईक कृषी महाविध्यालयाचे संचालक अविनाश डेकाटे, सिर्सी पोलिस चौकीचे जमादार असलम नौरंगाबादे उपस्थित होते. कार्यक्रमास गावातील स्त्री पुरुष नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
सूत्रसंचालन बि.के. सुलोचना दीदी यांनी तर आभार प्रदर्शन बि.के.सारिका दिदी यांनी केले.





