spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महर्षी कर्वे आदर्श महाविद्यालयाचा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करावा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

· उच्च व तंत्र शिक्षण विभागाशी समन्वय साधण्याचे निर्देश

 मुंबई :- श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठामार्फत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे उभारण्यात येत असलेल्या महर्षी कर्वे आदर्श महाविद्यालयाचा महत्वाकांक्षी प्रकल्प जलदगतीने पूर्ण करावा. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

महर्षी कर्वे आदर्श महाविद्यालयाच्या उर्वरित कामांबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची सद्यस्थिती, बांधकामाची प्रगती, निधीची आवश्यकता तसेच प्रशासकीय बाबींची माहिती दिली.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, या महाविद्यालयामुळे श्रीवर्धनसह परिसरातील मुलींना उच्च, दर्जेदार आणि परवडणारे शिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रलंबित प्रशासकीय बाबींचा तातडीने निपटारा करून प्रकल्पाच्या उर्वरित कामांना गती द्यावी. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही. महाविद्यालयासाठी सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीत महाविद्यालयाच्या बांधकामासह निधी वितरण, आवश्यक मान्यता आणि पुढील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.