किशोर साहू, मौदा :- श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने बोरी (घिवारी) येथील अंगणवाडी केंद्रात चिमुकल्यांचे वेषभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत बालकृष्ण, राधा रूपात सजलेल्या चिमुकल्यांनी सर्वांची मने जिंकली.
त्या निरागस चेहऱ्यांवरील हास्य, छोट्या-छोट्या पावलांतील उत्साह आणि संस्कृतीची सुंदर झलक या स्पर्धेत दिसत होती.
चिमुकल्यांच्या या निरागस रूपातून आपल्या संस्कृती, संस्कार आणि परंपरांची सुंदर ओळख पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते, हीच या कार्यक्रमाची खरी सुंदरता!
या सुंदर उपक्रमात मुख्याध्यापक लोकेश प्रतेके, शाळा समिती उपाध्यक्ष कैलास झलके,अगंवाडी सेविका दामिनी तिजारे ,मदतनीस प्रतिमा मेश्राम ,आरोग्यसेविका निशा तायडे, आरोग्य सहाय्यक वैद्य,आशा सेविका रंजना चवळे ,शाळा मदतनीस अनिता मडावी उपस्थित होते.





