कन्हान :- जिजाऊ ब्रिगेड कन्हान तर्फे श्रावण शिरवा कार्यक्रम मनोज बागडे यांच्या फार्म हाऊस गहुहिवरा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
रविवार (दि.६) सप्टेंबर ला सर्वप्रथम जिजाऊ च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदना घेऊन श्रावण शिरवा कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सर्व महिलांनी हिरव्या रंगाच्या साड्या परिधान करून मराठमोळा साज केला. श्रावण झुल्यावर सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला. महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. सर्वाकारिता नास्ता, चहा व जेवणाची व्यवस्था करण्यांत आलेली होती. महिलांनी श्रावण महिन्याचे वेगवेगळे गीत गाऊन अंताक्षरी खेळात चांगल्याच रंगुन आनंद घेतला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिवमती माया इंगोले अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड कन्हान, शिवमती छाया नाईक सचिव, सुनिता येरपुडे, अलका कोल्हे आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमास पुष्पा चिखले, लता जळते, माया भोयर, प्रिती कुकडे, मानिषा धुळस, आशा भोंबले, कल्पना श्रीखंडे, राजकन्या माटे, गोदावरी नागरे, रंजना इंगोले, पुष्पा लांडगे, लला वंजारी, सुनंदा लांडगे, जांभुळकर, पदमा राऊत, सुनंदा राऊत, सिता इवनाते, कविता खैरकर, प्रमिला अहिकर, सविता नाटकर, मीना रामटेके, रिना चौबे सह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.





