किशोर साहू, मौदा :- रक्षा बहुउद्देशीय संस्थांचे अध्यक्ष राष्ट्रपाल गजभिये याचा मार्गदर्शनातून इलाईट पब्लिक स्कूल चाचेर येथे जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. मुलांनी विविध प्रकारचे ड्रेस, राधाकृष्णाच्या वेषभूषा परिधान करून शाळेत आले होते. याप्रसंगी मुलांना कृष्णजन्माष्टमी विषयी माहिती सांगण्यात आली.
मुलांना चॉकलेटचे वितरण करून कार्यक्रमाच्या समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकवृंद शबनम शेख, भारती नारनवरे, नेहा पाल, संतोषी बरबटे , आचल वाणी व निकिता कावरे यांनी परिश्रम घेतले .





