– नागपूर महानगरपालिकेद्वारे एकल महिलांसाठी ऑनलाईन सर्वेक्षण व नोंदणी सुरू
नागपूर :- एकल महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना व कल्याणकारी उपक्रमांचा लाभ मिळवून देण्यासह एकल महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने राज्यात एकल महिलांचे सर्वेक्षण व नोंदणी सुरू आहे. ही नोंदणी महत्त्वपूर्ण असून, नागपूर शहरातील सर्व एकल महिलांनी सदर ऑनलाईन सर्वेक्षणात सहभाग नोंदवून आपली संपूर्ण माहिती अचूकपणे भरून नोंदणी करावी, असे आवाहन महापौर निता ठाकरे व आयुक्त डॉ. विपीन यांनी केले आहे.
महापौर निता ठाकरे व मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनात समाज विकास विभागामार्फत महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला व बाळ विकास विभागाच्या निर्देशानुसार, नागपूर शहरात एकल महिलांचे सर्वेक्षण व नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मनपा क्षेत्रातील पतीचे निधन झालेल्या एकल महिलांची माहिती संकलित करून त्यांना विविध सामाजिक, आर्थिक, तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने ही नोंदणी करण्यात येत आहे. यासाठी मनपाने ऑनलाईन पोर्टलद्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली असून, शहरातील सर्व पात्र एकल महिलांनी http://admin-dept-portal.emergent.host या संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती भरून नोंदणी करावी असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.





