किशोर साहू, मौदा :- पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, दहेगाव येथे विद्यार्थ्यांना शेतीपूरक अनुभवात्मक शिक्षण देण्यासाठी प्रत्यक्ष शेतात भात लावणी उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी चिखलयुक्त शेतात उतरून हाताने भाताची रोपे लावण्याचा अनुभव घेतला. शेतकऱ्यांचे कष्ट, भात पिकाची प्रक्रिया आणि अन्नाचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून समजावे हा यामागील मुख्य उद्देश होता.
या उपक्रमाचे नेतृत्व शाळेचे मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षकवृंद सुधीर कांबळे, सुधीर खंडाईत, राजेश रोहाड , सुजाता बोदेले ,प्रज्ञा रामटेके , संगीता कारेमोरे , ज्योती आंबिलढुके , उमेश उके व पुष्पलता उके, रंजना उके,यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व स्वतः शेतात उतरून लावणी कशी करावी हे प्रात्यक्षिक करून दाखवले.
विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. पुस्तकातील धडे शेतात प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक आणि संस्कारक्षम ठरला.





