spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा गडचिरोली जिल्हा दौरा

– शाळांना देणार भेटी; ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा

गडचिरोली :- राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे दि. ९ व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते विविध शाळांना भेटी देऊन ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार आहेत. भुसे यांचे बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन होईल. त्यानंतर त्यांचा वेळ राखीव असून गडचिरोली येथे मुक्काम राहील. गुरुवार, दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ते जिल्ह्यातील शाळांना भेटी देणार आहेत. त्यानंतर दुपारी १ वाजता समाज कल्याण भवन सभागृह, गडचिरोली येथे आयोजित ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीबाबतच्या आढावा बैठकीस ते उपस्थित राहतील. दौरा आटोपल्यानंतर सायंकाळी ७ वाजता भुसे हे गडचिरोली येथून शासकीय वाहनाने चंद्रपूरकडे प्रयाण करतील.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.