spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गट ग्रामपंचायत घोटमुंढरी येथील जि प शाळेच्या सभेत नवनियुक्त ग्रा पं सचिव हरीष धार्मिक यांच्या सत्कार व शाळेतील समस्यांचे निवेदन 

किशोर साहू, मौदा :- मंगळवार ( ता.8 सप्टेंबर) ला गट ग्रामपंचायत कार्यालय घोटमुंढरी येथील नवनियुक्त सचिव हरिष धार्मिक तसेच गट ग्रामपंचायत सर्व कमिटी,तिन्ही गावचे मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समिती यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद आदर्श शाळा घोटमुंढरी या शाळेत निमंत्रण देऊन तिन्ही गावच्या शाळा सुधार,भौतिक सुविधा, गरजा, अडचणी साधक बाधक मार्गाने चर्चा करून त्यावर उपाय योजना करून दूर करण्यासाठी शाळेच्या वतीने सभा आयोजित केलेली होती. त्यानिमित्ताने नवनियुक्त सचिव यांचे शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते स्वागत सत्कार करून शाळेतील समस्यांचे लेखी निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विकास धारगावे,अध्यक्ष उदय पांडे, उपाध्यक्ष मंगलसिंग देवतारे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पटले, शिक्षक कांबळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष धनसिंग पटले, ग्रामपंचायत सदस्य विलास पटले,अरविंद भोयर,शंकर पटले,मौसमी घरडे,पूजा पटले,संगीता चामट,मनोज चामट शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ढोलमारा, पिंटेश पटले, दीपंकर घरडे,कुणाल क्षीरसागर,कांचन पटले सह मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी शाळेतील संपूर्ण परिसर,शाळेचे सर्व वर्ग खोल्या, आय सी टी लॅब, ए आय लॅब, शौचालय, सांडपाणी , शाळेचे पटांगण इत्यादी ची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आणि ते ग्रामपंचायत चे माध्यमातून सोडवण्यासाठी चर्चा करण्यात आली.छोटे मुद्दे जे काही शाळेच्या बाबतीत आहेत ते येत्या आठ दिवसात आणि जे मोठे मुद्दे पेंटिंग,चित्रीकरण असे सर्व बाबी दिवाळी पर्यंत पूर्ण करून देण्याची सर्वांसमक्ष ग्वाही नवनियुक्त सचिव धार्मिक यांनी दिली. शाळेबद्दल सकारात्मक भूमिकेतून, विकास व सुधार आवश्यक समजून शाळेला प्राथमिक केंद्रबिंदू मानून आपले विचार मांडून मनोगत व्यक्त केले.

त्याकरिता सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन, आभार व्यक्त केले.

मुख्याध्यापक विकास धारगावे यांनी शाळेचा दर्जा,गुणवत्ता यावर भर देत शाळेला पीएम श्री श्रेणीत आणण्यासाठी आपले मत व्यक्त केले.शाळेबद्दलची सचिवांची भूमिका ऐकून त्यांची स्तुती केली.आभार प्रदर्शन शिक्षक मच्छिंद्र कांबळे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीने सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.