किशोर साहू, मौदा :- दरवर्षीप्रमाणे यंदाही आज गुरुवार (ता. 10 सप्टेंबर)ला कोदामेंढी येथे बैलपोळा उत्साहात व शांततेत साजरा करण्यात आला. बैल जोड्या व बैलपोळ्याच्या कार्यक्रम पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. बैलपोळा भरणाऱ्या परिसरातील इमारतीच्या छतावरही मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष बालगोपालांची गर्दी दिसत होती.
याप्रसंगी भाजपा तालुका मौदा मंडळ अध्यक्ष भगवान बावनकुळे, तालुका समन्वय समिती सदस्य नरेश बावनकुळे, ग्रामपंचायत कोदामेंढी सरपंच आशिष बावनकुळे, उपसरपंच गोपाल गिरमेकर सह समस्त ग्रामपंचायत सदस्य गण, साईबाबा पतसंस्थेचे संचालक प्रकाश बावनकुळे, मनसेचे राजेश देवतळे, गावातील प्रतिष्ठित नागरिक सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैलपोळा फुटल्यानंतर शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांची ग्रामस्थ पूजा अर्चना करून बैलपोळ्याच्या शुभेच्छा देत होते.





