किशोर साहू, मौदा :- चाचेर – निमखेडा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या शेतकरी व मजूरवर्गांचे वास्तव्य असलेल्या निमखेडा हिंगणा टोली तान्हा पोळा सणाचा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुलांना शालेय साहित्य वही, पुस्तक, पेन, पेन्सिल वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमला संकेत झाडे सरपंच खंडाळा(गांगनेर), भाजपा किसान आघाडी जिल्हा महामंत्री, मनोज झाडे उपसरपंच निमखेडा,विनोद बिसेन तंटामुक्ती अध्यक्ष, उमेश शेंडे,प्रशांत ढोमणे,पंकज अमृते, विजय जांभुळे, लखन वाघमारे, बंडू जांभूळे,महेंद्र मरसकोल्हे, रज्जु कुर्रे, मनराज पंधरे,कैलास कालसर्पे, बिहारी वाघ,अंकुश लिंगे, छोटीबाई बिसेन,रंजू मुरखे, कांता मरस्कोल्हे, सुलोचना राऊत सह मोठया प्रमाणात हिंगणा टोलीतील गावकरी उपस्थित होते.





