spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मोहगाव देवी येथे पारंपरिक बैलपोळा उत्साहात संपन्न

– बैलजोडी चालकांचा सत्कार; विविध बक्षिसांचे वाटप

हंसराज,भंडारा मोहगाव देवी (मोहाडी,):- मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी येथे ग्रामपंचायतीच्या भव्य आवारात पारंपरिक बैलपोळा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांच्या सर्जा-राजाची मनोभावे पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बैलजोडी चालकांचा दुपट्टा व छत्री देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. बैलपोळ्याच्या निमित्ताने विविध प्रकारच्या बक्षीसांचे आयोजन करण्यात आले होते; मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने मशाल पेटवून, सर्व गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहकार्याने पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मान्यवर म्हणून विकास देवराव लेंडे (सीए), सरपंच सुधाकर रामटेके, उपसरपंच उमेद लेंडे, महेश लेंडे, पोलीस पाटील बाळबुधे , पत्रकार नरेंद्र शेंडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध क्षेत्रांतील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.