spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

11,470 लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध;अॅग्रीस्टॅक नोंदणी, आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

यवतमाळ :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 11470 लाभार्थी शेतक-यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 1256 लाभार्थ्यांचा समावेश आहे.

ही यादी ग्रामपंचायत, गावचावडी, सहाय्यक निबंधक / सहकार अधिकारी श्रेणी-1 तालुका ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था, बँका यांचे कार्यालयात, शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध असून योजनेस सर्व पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे नाव यादीमध्ये असल्याची खात्री करुन नावासमोरील विशिष्ठ क्रमांक, बँकेचे पासबुक, आधार कार्ड, आधार कार्डशी संलग्न मोबाईल यासह जवळचे सेतु सुविधा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करावे.

कर्जमुक्ती योजनेस पात्र असणा-या ज्या शेतक-यांची अॅग्रीस्टॅक पोर्टलवर अद्यापही नोंदणी झालेली नाही, अशा शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेचे आधार प्रमाणिकरण सुलभतेने होण्यासाठी प्रथम अॅग्रीस्टॅक पोर्टलवर तात्काळ नोंदणी करुन घ्यावी.त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 चे आधार प्रमाणिकरण करावे.

यादीमध्ये नाव आलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी सेतु सुविधा केंद्रावर आधार प्रमाणिकरण करण्यापूर्वी आपले नाव, बँक कर्ज खाते क्रमांक, कर्ज रक्कम याबाबत शहानिशा करुन आधार प्रमाणिकरण करावे व सुलभरित्या कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ यांनी सर्व शेतकऱ्यांना केले आहे.

विशिष्ठ क्रमांकाचे यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्ज खात्याबाबत तक्रार असल्यास त्यांना योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.