नागपूर :- युवारंग प्रतिष्ठान, गजानन चौक, रेशीमबाग येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही तान्हा पोळा उत्सव ४०० हुन अधिक बालगोपाळांच्या उत्तम वेशभूषा आणि बैल सजावट करून उत्साहात संपन्न झाला. ही *स्पर्धा उत्कृष्ट बैल सजावट ,वेशभूषा, उत्तम संदेश अशा विषयावर आधारित असून या स्पर्धेत सहभागी बाळगोपाळांसाठी एकूण २१ दमदार पुरस्कार देण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक सायकल, द्वितीय- वेडिओ गेम, तृतीय-स्टडी टेबल, चतुर्थ- एड्यूजेशन बोर्ड, पांचवा- कॅरम बोर्ड आणि ६ स्पर्धकांना प्रोत्साहन पुरस्कार व उत्तम वेशभूषेसाठी १० बाळगोपाळांना विशेष प्रोत्साहन कैश प्राइस देण्यात येईल. या स्पर्धेचे अध्यक्षस्थान नंदनवन भाग संघचालक अशोक बुजोने, तर प्रमुख पाहुणे म्हणून सक्करदरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक रमेश खुणे, डॉ राजीव त्रिवेदी, एड रमण सेनाड, नगरसेवक चंद्रकांत खांगार , मानसी शिमले, हितेंद्र चव्हाण, शिमले, प्रदीप तुपकर, प्रशांत मानेकर, रौनक चौधरी,पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन युवारंगचे गौरव शहाकार, डॉ श्रीरंग वराडपांडे, यांचे असुन स्पर्धेसाठी सारंग गादेवार, अमित निचकवडे, डॉ पराग दांडेकर, डॉ योगेश ईंगोले, धर्मेंद्र खमेले, प्रवीण गुल्हाने, सत्यंजय त्रिवेदी, स्नेह शेरेकर, रोहित त्रिवेदी, विनय शाहू, प्रतीक त्रिवेदी, ,विशाल शहाकार आदी पदाधिकार परिश्रम घेतले.
युवारंग प्रतिष्ठान, लोकजागृती मोर्चा, महावीर युथ क्लब,श्री सद्गुरू सेवातीर्थ फाऊंडेशन, एकवीरा शारदोत्सव मंडळ , सनातन सांस्कृतिक क्रीडा परिषद यांचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.





